Navneet Rana : सध्या अबू आझमी यांनी औरंगजेबाची केलेली प्रशंसा नव्य वादाचे कारण ठरले होते. औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याच प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला, अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम औरंगजेबाबद्दल प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय. औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय.
अबू आझमी यांनी सांगितले की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, तर त्यांना मी लक्षात आणून देते की त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप म्हणून राहतात. अश्या लोकांना उत्तर देण्याच काम राज्य सरकारने केलं पाहिजे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. हिंदुत्व विचारधारेचे सरकार आमचे आहे, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी या विषयी तक्रार दाखल करत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अबू आझमी विरोधात आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पत्र दिलं असून त्याच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची आहे. हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून हे विधिमंडळ परिसरात घडले असल्याकारणाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल आहे. हे वक्तव्य समोर येताच एकनाथ शिंदे यांनी देखील हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी देखील आमची मागणी आहे. तर विधिमंडळात त्यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. अबू आझमी यांच्या या वक्तव्यावरून अनेक नेत्यांनी, विरोधकांनी सडून टीका केली आहे. महापुरुषांबद्दल वारंवार बोलले जात आहे. त्यासाठी कोनेतेही कायदे नाही, त्यामुळे विधिमंडळात याबद्दल नवीन कायदे पारित करण्यात यावे,अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
Anil Parab : अनिल परबांच्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात