spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

NCP: महायुतीत इनकमिंग सुरूच; लवकरच दोन बड्या नेत्यांचा Rashtrawadi मध्ये प्रवेश

भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महायुतीने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभेमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता महविकास आघाडीला वारंवार खिंडार पडत आहे. कधी काँग्रेस तर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते महायुतीतील पक्षांमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला कॉंग्रेसचे दोन बडे नेते लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण आहेत बडे नेते?

NCP Ajit Pawar Gat: भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महायुतीने लोकसभा निवडणुकीतून धडा घेत विधानसभेमध्ये दमदार कामगिरी केली. त्यानंतर आता महविकास आघाडीला वारंवार खिंडार पडत आहे. कधी काँग्रेस तर कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेते महायुतीतील पक्षांमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला कॉंग्रेसचे दोन बडे नेते लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण आहेत बडे नेते?

भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मीनल खतगावकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, काँग्रेस हा राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. तर दुसरीकडे महायुतीला मोठा दणका बसला, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीची सत्ता आली. महायुतीच्या राज्यात तब्बल २३२ जागा निवडून आल्या, तर महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना केवळ ५० जागांवरच समाधान मानावलं लागलं.

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीसाठी आणखी एक विषय डोकेदुखी ठरत आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी नुकतीचं झालेली विधानसभेची निवडणुक नायगाव विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर लढवली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे खतगावकर कुटुंब अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघातील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे महायुतीची वाट धरत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचं चित्र आहे.

हे ही वाचा : 

Satish Bhosale : खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर; वनविभागाची मोठी कारवाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता? मग हे सरदार कोण? – Amol Mitkari

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss