Friday, December 1, 2023

Latest Posts

राष्ट्रवादीनेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली. खडसे यांना उपचारासाठी जळगावहून मुंबईला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. खडसे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच त्यांनी तातडीने एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांच्या उपचारासाठी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संपर्क साधला होता.

हे ही वाचा : 

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss