spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

महायुती सरकारचा रडीचा डाव; इस्रायली तंत्रज्ञानाने ईव्हीएम मशीन हॅक! शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवाराचे गंभीर आरोप

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्षाकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) शहराध्यक्ष व हडपसर मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी ईव्हीएमबाबत (EVM Machine hacked) गंभीर आरोप केले आहे

प्रशांत जगताप यांनी आज (बुधवार, २७ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधला. ईव्हीएम मशीन हे इस्रायली तंत्रज्ञान वापरुन हॅक केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ऐवढेच नाही तर प्री प्लॅनकरून आमचा पराभव करण्यात आल्याचं देखील जगताप यांनी म्हटलं आहे.

प्रशांत जगताप यावेळी म्हणाले, “ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला आहे. ईव्हीएम हॅक करुन सेट करुन आमचा पराभव करण्यात आला आहे. या साठी प्री प्लॅन करण्यात आला होता. हे सर्व जाणीव पूर्वक घडवण्यात आले आहे. इस्रायली तंत्रज्ञाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आले आहे. या मशीनमध्ये पक्षचिन्ह व उमेदवारांचे चिन्ह लोड करताना गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे कोणतं चिन्ह लोड केलं हे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे या मशीनवर आम्हाला संशय आहे. या मशीनला खास प्रोग्राम देण्यात आला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी विशिष्ट वेळेत हे मशीन काम करेल. या मशीनमध्ये टाइमिंग सेट केलाय. त्यामुळे ईव्हीएममधील घोळ समोर येणार नाही.”

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, “नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून धक्कादायक आणि धोकादायक निकाल आहे. या निघाल्यामुळे देशातील लोकशाही संपते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही. आम्ही व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरणार आहे. हे मशीन हॅक करण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरले आहे. हे मशीन हॅक झाले आहे हे येत्या आठवड्यात सिद्ध करणार असून महायुती सरकारने रडीचा डाव खेळाला आहे,” असे देखील जगताप म्हणाले.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss