साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनावर काही आक्षेप घेतले होते. त्यांनी शरद पवारांवरही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर आता शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार म्हणाले, “साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हे यांनी तसं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं, संजय राऊत जे बोलले ते १०० टक्के योग्य असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. कमी कालावधीत चार पक्ष बदललेल्या नीलम गोऱ्हे यांना चार टर्म कशा मिळाल्या हे सर्वांनाच माहित आहे. साहित्य संमेलनाचा वापर हा राजकीय कारणासाठी होतोय हा आरोप मात्र त्यांनी स्पष्टपणे नाकारला आहे.
पुढे ते म्हणाले की, राऊत म्हणाले ते १०० टक्के बरोबर आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करायची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या. नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्त्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं, त्या संबंधात संजय राऊत जे म्हणाले ते योग्य आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. साहित्य संमेलनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्ची देणे, पाणी देणे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपांवरून संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.
हे ही वाचा: