Wednesday, April 24, 2024

Latest Posts

गौतमी पाटीलच्या आडनावावरून नवीन वाद : संभाजीराजांनी घेतली वादात उडी

काल देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रपती देशाच्या प्रथम नागरिक आहेत.

काल देशाच्या नव्या संसदभवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला. राष्ट्रपती देशाच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं, अशी भूमिका विरोधी पक्षांची होती. मात्र काल पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. त्यावरही संभाजीराजे बोलले आहेत. नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली आहे. आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना संरक्षण दिलं. त्यामुळे स्वातंत्र्य सर्वांना आहे. महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. त्यामुळे सर्वांनी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळालं पाहिजे,असे माता संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे. बाकीच्या राज्यात जातीवर राजकारण चालतं. जाती विषमता जर कमी करायची असेल बहुजन समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. सध्या खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. लोक या अशा राजकारणाला कंटाळले आहेत. खोके-बोके, मांजर-कुत्रे ही भाषा ऐकण्यापेक्षा सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडावा, यासाठी लोक अपेक्षा करत आहेत, असंही ते म्हणालेत.ईडीला मी घाबरत नाही का? असं विचारलं असता, ईडीला घाबरायला मी आयुष्यात चुकीचं काम केलंच नाही. त्यामुळे ईडीला घाबरायचं काय कारण? ज्यांना घाबरायचं ते घाबरतील, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

राजस्थान उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय

अनिल परब आणि सदानंद कदम यांना मिळाला दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss