महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात गुरुवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री १०. ३० ते १२ वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रुफल पटेल आणि जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये राज्याचा पुढील मुख्यमंत्री (Maharashtra CM) आणि खातेवाटपाच्यादृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात आले होते. राज्याचा नवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे.
आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आता उद्या एक महत्त्वाची बैठक होईल. काल मी माझी भूमिका जाहीर केली. आजच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. आम्ही सकारात्मक आहोत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी मी घेतो आहे. लाडकी बहीण फेमस आहे लाडका भाऊ फेमस आहे. लाडकी बहीण महत्वाची योजना आहे. सरकारवर जनता खुश आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन ५ दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल २३० जागांवर यश आलं. पण अद्याप सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा निघालेला नाही. त्यातच काल रात्री दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितीत होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule