‘मी टायगर नाही, मी राणे आहे’, असं म्हणत निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘माझं जे काही मत होतं ते मी देवेंद्र फडणवीसांसमोर मांडलं आहे आणि माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे’, असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान त्यांनी निवृत्तीची निर्णय मागे घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी टायगर इज बॅक अशा आशयाचे बॅनर लावले होते. झाराप येथे निलेश राणेंच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली होती.
कुडाळ – मालवणमधील सर्व जागा जिंकू – निलेश राणे
येणाऱ्या काळामध्ये कुडाळ – मालवण आणि कोकणातील सर्व जागा नेत्यांच्या सांगण्यावरुन निवडून आणायच्या आहेत. त्याच अनुषंगाने मी काम सुरु केलय. त्यामुळे भाजपचा नक्की विजय होईल, असा विश्वास यावेळी निलेश राणे यांनी व्यक्त केला.
निवृत्ती घेताना निलेश राणेंनी काय म्हटलं ?
निलेश राणे यांनी निवृत्ती घेताना म्हटलं होतं की, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…