spot_img
spot_img

Latest Posts

नितेश राणे यांनी केला ठाकरे सरकारवर मोठा आरोप

नितीन देसाई (Nitin Desai) यांना मातोश्री जवळचा माणूस धमकी देत होता असा आरोप नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

नितीन देसाई (Nitin Desai) यांना मातोश्री जवळचा माणूस धमकी देत होता असा आरोप नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच ठाकरे(Thackeray) या सिनेमाचे शूटिंग याच (ND Studio) एनडी स्टुडिओमध्ये झालं होत. त्याचे पैसे दिले का? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्यातेनंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे कुटुंबावर आरोप केला आहे. नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना हवा होता, म्हणूनच मातोश्री (Matoshree) जवळचा माणूस त्यांना धमक्या देत होता असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हाच मुद्दा पकडून त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांचावर सुद्धा टीका केली आहे.

नितेश राणे म्हणाले ” नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एन.डी स्टुडिओ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना हवा होता. नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. मातोश्रीजवळच्या व्यक्तीकडून नितीन देसाई यांना धमक्या दिल्या जात होत्या. ‘ठाकरे’ सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओमध्ये झालं होतं. त्याचे पैसे दिलेत का? असे प्रश्न करून संजय राऊत यांनी उत्तर द्यावे असे नितेश राणे म्हणाले आहेत.

नितीन देसाई यांच्या आत्महत्यातेनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्याकडून अनेक आरोप देखील केले जात आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्यातेनंतर शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) म्हणाले ,”नितीन देसाई यांंचं दुःख काय होतं.. हे जर सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत (Ratnagiri) तोंड दाखवायलाही जागा होणार नाही” या टीकेमुळे सगळीकडे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. उदय सामंत यांनी नक्की कोणाला टोला लावला हे समजू शकले नाही. सनी देओल (Sunny Deol) यांना जो न्याय दिला तो नितीन देसाई यांना का दिला नाही असा प्रश्न संजय राऊत यांनी केंद्राला केला होता. तर दुसरीकडे नितीन देसाई जेव्हा मदत मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले तेव्हा एका मराठी उद्योजकाला दरवाजातून हकलवून लावण्यात आले याची यादी देखील आमच्याकडे आहेत ” असे भाजप आमदार प्रवीण दरेकर (BJP MLA Praveen Darekar) म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण आहेत? अजित पवार की चंद्रकांत पाटील…

राशिभविष्य २८ ऑगस्ट २०२३, आजच्या दिवशी तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.

दुष्काळी बीडची सभा जल्लोषामुळे गाजली, धनंजय मुंडेंना दोन दिवसानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विसर पडला की का ?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss