Tuesday, April 23, 2024

Latest Posts

त्र्यंबक ग्रामस्थांकडून पडदा टाकण्यात येत असतानाच, नितेश राणे पोहोचले मंदिरात केली महाआरती

त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे या दिवशी जो प्रकार घडला तो प्रकार अजूनही ऐरणीवरसिज आहे. अनेक सत्ताधाऱ्यानी त्रंबक या विषयात हात घातला आणि प्रतीकेणें या मुद्द्याला उचलून घेण्याचा प्रयत्न देखील केला.

त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे या दिवशी जो प्रकार घडला तो प्रकार अजूनही ऐरणीवरसिज आहे. अनेक सत्ताधाऱ्यानी त्रंबक या विषयात हात घातला आणि प्रतीकेणें या मुद्द्याला उचलून घेण्याचा प्रयत्न देखील केला. त्र्यंबक प्रकरणी तुषार भोसले हे तेथील पौरोहित्य सांभाळणारे आहे. मात्र इतके दिवस होऊन देखील हा वाद पटताच चालले बघायला मिळत आहे. या मध्ये तेथील ग्रामस्थ आणि त्र्यंबक मंदिराच्या ट्रस्टीकडून हा वाद निवळला जाऊ शकत होता मात्र असे असून सुद्धा राजकारण्यांकडून हा वाद्य वारंवार चव्हाट्यावर आणून ठेवला जात आहे. हा वाद अद्यापही जैसे थे असून एकीकडे ग्रामस्थांकडून वादावर पडदा टाकण्यात आला असताना देखील काही राजकारणी त्याला पुन्हा खात पाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे,

मागील आठवड्यात देशभरात त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचे प्रकरण चांगलेच गाजले. राज्यभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक नेत्यांनी भूमिका मांडल्याचे दिसून आले. दुसरीकडे गावकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेत वाद मिटवण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणावरून राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आमदार नितेश राणे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी या निमित्ताने आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल होत दर्शन घेतले. त्याचबरोबर विविध संघटनाच्या माध्यमातून मंदिरात महाआरती करण्यात आली. आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. यावेळी माजी आदिवासी मंत्री अशोक उईके हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंदिराच्या पायरीवर गोमूत्र टाकत शुद्धीकरणदेखील करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर बचाव समितीच्या वतीने देखील सकाळी 10 वाजता महाआरती करण्यात आली आहे. या आरतीसाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर संदलवेळी दाखविण्याची 100 वर्षांची परंपरा असल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा पूर्णतः खोटा असून ते दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी कालच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खु;असा केला होता. त्र्यंबक मंदिर वादानंतर राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन यावर माध्यमांशी बोलताना हा दावा केला होता. मात्र यावर तुषार बॉल यांनी संजय राऊत यांच्या कडे त्यांनी केलेल्या दाव्याविषयी परंपरेचे जाहीरपणे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले आहे. याप्रकरणी ज्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, त्यापैकी एक संशयित सलमान अकील सय्यद याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे भोसले म्हणाले. तर दोघा-तिघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही राऊत त्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांचाही तुषार निषेध भोसले यांनी नोंदवला.

हे ही वाचा:

मोठी बातमी! मी मुंबईत बॉम्बस्फोट…, ट्विटरवरून दिली धमकी

अभिनेते Ray Stevenson यांनी वयाच्या ५८ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss