spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

हिंमत असेल तर राहुल गांधीजवळ जा, त्यांना वीर सावरकरांची माफी मागायला लाव, Nitesh Rane यांची Sanjay Raut यांच्यावर आगपाखड

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आत भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अमित शहा यांनी एका भाषणात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “वीर सावरकर यांच्या सन्मानार्थ रामाहूल गांधी दोन वाक्य बोलू शकतात का?” असा सवाल विचारला होता. यावरून संजय राऊत यांनी “वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही आहात? त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे,” असे वक्तव्य केले होते. अश्यातच आता भाजप खासदार नितेश राणे यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे यावेळी म्हणाले, “वीर सावरकर यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ही मागणी करण्यापूर्वी त्याने नवीन बॉस राहुल गांधी यांना विचारलं आहे का? राहुल गांधींनी डोळे वटारले तर स्टेजवर उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळणार नाही. हिंमत असेल तर राहुल गांधीजवळ जा त्यांना वीर सावरकरांची माफी मागायला लाव. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देणार किंवा मागणी करणार असे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात छापण्याची हिंमत हे उबाठा सेनेचे लोकं करु शकतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानाची टोपी घालतात असा जावई शोध संजय राऊत ने लावलाय त्याचा एक तरी फोटो या चारसो बीसने दाखवावा. तुझ्या मालकाचं धर्मांतर झालं तस सर्वांना समजतोस का? तुझ्या मालकाच्या स्वागताच्या वेळी अल्ला हू अकबर, पाकिस्तान जिंदाबादचे नारे देतात. लवकरच तुझा मालक मशीद मध्ये नमाज पडताना दिसेल,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “जेव्हा अमित शाहा उद्धव ठाकरेंना भेटायला यायचे, मान सन्मान द्यायचे तेव्हा तो तुम्हाला घेता आला नाही. अमित शाह वाईट असतील तर रश्मी वहिनी आणि त्यांचा मुलगा आदित्य खाजगी विमानाने दिल्लीला कोणाला भेटायला गेलेले? मिठाला न जगणारे नमक हराम म्हणजे हा संजय राऊत आहे,” अश्या शब्दांत त्यांनी राऊतांवर टीका केली.

हे ही वाचा:

बाळासाहेबांचे खरे मानसपुत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह! उद्धव ठाकरेला त्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही: Nitesh Rane

एकनाथ शिंदेंनी दिला सभेला नकार, उमेदवाराचा ब्लडप्रेशर वाढून थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss