राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आत भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे.
अमित शहा यांनी एका भाषणात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, “बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणताही नेता दोन वाक्य बोलू शकतो का?” असा सवाल विचारला होता. यावरून संजय राऊत यांनी आज (सोमवार, ११ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत चांगलीच आगपाखड केली आहे. अश्यातच आता भाजप खासदार नितेश राणे यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
नितीश राणे म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जतन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतात. जे त्यांच्या मुलाला जमलं नाही. बाळासाहेबांची प्रत्येक इच्छा नरेंद्र मोदी आणि अमित शाह पूर्ण करत आहेत. तुमचा उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्यापासून हिंदुहृदयसम्राट नाव लावायला घाबरतो. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला नाही,” असे ते म्हणाले.
“२०१९ ला जनतेने युती साठी मतदान केलं मात्र हिंदुत्वशी बेईमानी करुन राजकारण चिखलमय करण्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. ठाकरे गटाचे भविष्य अंधारात आहे. बाळासाहेबांचे खरे मानसपुत्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. ज्याने बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्या उद्धव ठाकरेला त्यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरेने बाळासाहेबांचं नाव घेऊ नये,” असे ते म्हणाले.
ते पुढं म्हणाले, “संजय राऊतचा मालक मुख्यमंत्री होणार नाही आणि हा गृहमंत्री होणार नाही. सरपंच होण्याची लायकी नसलेल्यांनी गृहमंत्री होण्याची स्वप्न बघू नये. उद्धव ठाकरेला आता मुख्यमंत्री बणण्यासाठी १० जन्म घ्यावे लागतील. संजय राऊतमध्ये हिंमत असेल तर सिल्वर ओक समोर बोलून दाखव. महाराष्ट्र पाकिस्तान मध्ये आहे का? देशाचे पंतप्रधान गृहमंत्री प्रचारासाठी फिरत असतील तर काय झालं? उद्धव ठाकरेंची प्रचाराची जागा चुकली आहे त्याने पाकिस्तान मध्ये प्रचार केला पाहिजे. तुमची जागा पाकिस्तान मध्ये आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…