Saturday, April 20, 2024

Latest Posts

नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार

सध्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसतात.

सध्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसतात. त्याचबरोबर ते सत्तेरवर असलेले शिंदे सरकारवर देखील ते निशाणा साधतात. दररोज संजय राऊत हे पत्रकार परिषद घेतात अनेक विषयांवर भाष्य करत असतात. यावर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देतात.

आज संजय राऊतांनी सकाळी शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरुनही राऊतांनी निशाणा साधला आहे. आता यावर आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये आमदार नितेश राणे म्हणाले की, ठाकरेंची शिवसेना चायनीज आहे आणि शिवसेनेचा नेता संजय राऊत आहे. ही चायनीज शिवसेना असल्यामुळे कधीही बिघडू शकते. शरद पवारांनी संजय राऊतांच्या कानातून रक्त काढेपर्यत लायकी काढली आहे म्हणून संजय राऊत आता अजित पवार यांच्यासोबत बोलत नाहीत. असे खोचक शब्दात नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे.

महाविकास आघाडीच्या एक इंटरनेट सर्व्हेनुसार शिवसेनेला राज्यामध्ये केवळ २२ जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडी पडेल असे दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये २२ चे ०२ कसे होतील असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss