ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणावरून शिंदेंवर निशाणा साधला आहे. राज्यात होणाऱ्या ड्रग्स तस्करीवर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा व्यापार वाढलेला आहे. याचं उत्तर देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा लागेल. रेव पार्टीमध्ये सापाचं विषापासून तयार होणारा अमली पदार्थ सेवन करणारे वर्षावर पोहोचतात आणि त्यांचं नाव तुम्हाला माहित आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती नाही?, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला आता भाजप आमदाराने उत्तर दिलं आहे. ड्रगमुक्त महाराष्ट्राची सुरवात मातोश्रीपासून करा.
यावेळी बोलत असताना नितेश राणे म्हणले आहेत की, दुसऱ्यांना नौंटकी बोलण्याऱ्या संजय राऊतचं आयुष्य तमासगीर सारखं आहे. ते तरी प्रामाणिक असतात. बीएमसीचं टेंडर कोणाला द्यायचं ते सांगावं लागेल. तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा पळून जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर येऊन राहायचा. दुसऱ्यांना बोलण्यापूर्वी तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा, असं म्हणत भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं तर तुझ्या मालकाच कुटुंब आर्थर रोड जेलमध्ये असेल. कोणीही नाराज नाही. मुख्यमंत्री साहेबांना प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन करण्याचे अधिकार आहेत, असंही नितेश राणे म्हणालेत. देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार करतात, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्याला नितेश राणे यांनी आता उत्तर दिलं आहे.
कोरोनानंतर सर्वात गतीने वाढणारी अर्थ व्यवस्था म्हणजे भारत. या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या अनाडी कामगाराला कधीच कळणार नाहीत. बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा चढता आलेख होता. आता उद्धव ठाकरेच्या कारकिर्दीत ठाकरे गट नावाचं छोटं मित्रमंडळ झालं आहे. याबाबत संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा, असं नितेश राणे म्हणालेत. तुझ्यासारख्या चवन्नी लोकांनी शिवसेनेची ही अवस्था केली. आदित्य ठाकरे दिनोच्या घरी आयुर्वेदिक उपचारासाठी जायचा का? सत्य नारायण पूजेला जायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पूजा करायला गेले असताना आदित्य ठाकरेमध्येच उठून गेलेला. कुठल्या नशेत होता? तुझा मालकाचा मुलगा किती शुद्ध आहे? कोणकोणत्या ड्रग माफियासोबत पार्टी करतो ते सांगावं लागेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
हे ही वाचा :
फुलंब्रीकर कुटुंब कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!
शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.