नवनिर्वाचित मत्स्य व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ते काल सासवडमध्ये बोलत होते. हिंदुत्वाच्या विषयावर अनेकदा आमदार नितेश राणे यांनी वक्तव्य केले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले आहे. त्यांनी केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असं म्हंटल आहे. यानंतर काँग्रेस नेत्यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. तर वर्षा गायकवाड यांनी नितेश राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांचे ट्विट
केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!
जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!
नेमकं काय बोलले मंत्री नितेश राणे –
आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे, ते कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही असं नितेश राणे म्हणाले. आता आम्ही टोकाची भाषणे द्यायला लागलो, तर लोकच आम्हाला विचारतील तुमचे सरकार आहे, त्यामुळे आता आम्हाला असं काय करावं लागणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.
पुढे ते बोलले, जो कायदा अन्य धर्मियांना लागतो, तोच कायदा हिंदू धर्माला लागतो. कायद्याच्या चौकटीत सगळं काम हेच आम्हाला अपेक्षित आहे. जे सगळे कायदे अन्य लोकांना लावता, तोच कायद्या आम्हाला लावा. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखवतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असं नितेश राणे म्हणाले. ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात,आमच्या नसा नसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत ? मग पाकिस्तानमध्ये लावणार का ? असा सवाल त्यांनी केला.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका