Sunday, December 3, 2023

Latest Posts

नितेश राणेंचा ठाकरे कुटूंबावर हल्लबोल, बेबी पेंग्विनला अटक होणार

सध्या राज्यात अनेक घडामोडींना उधाण हे आले आहे. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर दुसरीकडे राज्यातील नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करणे थांबवत नाहीत.

सध्या राज्यात अनेक घडामोडींना उधाण हे आले आहे. एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर दुसरीकडे राज्यातील नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करणे थांबवत नाहीत. अशातच काल दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी ठाकरे कुटुंब हे डेहराडूनला रवाना झाल आहे असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) यांनी ट्वीटद्वारे केला आहे.

काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल हा केला होता. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल राणेंनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते असे म्हणत नितेश राणेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियाने हीने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असेही राणे म्हटले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला प्रकरणात अटकेची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

फुलंब्रीकर कुटुंब  कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर  या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss