spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

नितीन गडकरींने केला अनावधानाने पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाचा उल्लेख

राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. निकाल लागून दीड महिना उलटला असून अद्याप राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या नावाची घोषणा झाली नाही आहे. नागपूरमध्ये पालकमंत्री कोण होणार याबाबत राज्यभरात उत्सुकता आहे. आता याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूतोवाच केलंय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरींनी अनावधानानेच पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक रित्या पालकमंत्री पदाची घोषणाकरण्याआधीच नागपूरच्या होणाऱ्या पालकमंत्र्यांचे नाव अप्रत्यक्षपाने जाहीर करून टाकल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं जाहीर झालेली नसल्याने महायुतीत पालकमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं बाेललं जात आहे. दरम्यान, महायुतीचे मंत्री पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, चढाओढ नसल्याचं सांगत आहेत. राज्यात विधासभा निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला असल्यावर अद्याप पालकमंत्री जाहीर झालेला नाही आहे. त्यात आता नितीन गडकरींने अनावधानाने पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

नागपूर मध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनावधानाने पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाव पालकमंत्री म्हणून घेतला आहे समजताच त्यांनी लगेच याबाबत आता पर्यंत घोषणा झाली नसल्याचे ही स्पष्ट केले. मात्र अप्रत्यक्षरीत्या पालकमंत्री बावनकुळेच होणार असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखा जाहीर करणाऱ्या समारंभात गडकरी बोलत असतांना भाषणादरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा उल्लेख नागपूरचे पालकमंत्री म्हणून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अप्रत्यक्षपणे पालकमंत्री कोण होणार याबाबत नाव जाहीर केल्याने पुढच्याच वाक्यात बावनकुळे अद्याप पालकमंत्री झाले नसले तरी तेच पालकमंत्री होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बावनकुळे यांना काहीही अशक्य नाही. असंही ते म्हणाले.

राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं जाहीर झालेली नसल्याने महायुतीत पालकमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं बाेललं जात आहे. दरम्यान, महायुतीचे मंत्री पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच, चढाओढ नसल्याचं सांगत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर आधी मुख्यमंत्री कोण होणार यावरून वेळ लागला नंतर शपथविधीही उशीराच झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांना खाती वाटप करतानाही बरीच वाट बघावी लागली. आता निकाल लागल्यानंतर साधारण दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून राज्यातील विविध जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावांची घोषणा झालेली नाही.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss