Nitin Gadkari on Caste : राज्यामध्ये सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यामधील सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मैदानांमध्ये उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहेत. तसेच सर्व पक्षांकडून त्यांचे जोरदार प्रचार देखील सुरु झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोक वक्त्यासाठी प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक स्पष्ट विधान केले आहे. सध्या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आणि इतर जाती असा संघर्ष दिसत आहे. यामध्ये जातीचे राजकारण घट्ट होत असल्याचे दिसत आहे. यावरती नितीन गडकरी यांनी त्यावर भाष्य केले आहे.
सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महाविकास आघाडीने आणि महायुती जाहीरनामा जाहीर केला आहे. त्यात घोषणांचा पाऊस पाडला आहे. राजकीय या वातावरणामध्ये काही नेत्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेतली जातात. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. यात नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एक स्फोटक विधान केले आहे. सध्या राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आणि इतर जाती असा संघर्ष होताना दिसत आहे. जातीचे राजकारण घट्ट होत असल्याचे दिसत आहे. यावरती नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.
जात किनाच्या मनात? मराठवाड्यासारखाच विदर्भात मध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. नागपूर, अकोला वगळता भाजपाला कमाल दाखवता आली नाही. शिंदे सेनेला बुलढाण्याची एक जागा राखण्यास यश आले आहे. त्यावेळी कुणबी, मराठा आरक्षण, आदिवासी, मुस्लिम हे मुद्दे गाजवले. पण गडकरी याना या फॅक्टरचा फटका बसला नाही. या सर्व घटनाक्रमावर नितीन गडकरी यांनी मन मोकळं केलं आहे.
नितीन गडकरींनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी जात ही पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे स्पष्ट वक्तव्य केलं. जात जनतेच्या मनात नाही, तर ती पुढाऱ्यांच्या मनात असल्याचे असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की काही मतदारसंघामध्ये अगदी अल्पसंख्यांक जातीचा खासदार, आमदार निवडून आले. त्यामुळे जातीच्या आधारावर निवडणुकीची गणित मांडण्यात येतात, आणि ते ती निकालानंतर चुकतात, असे ते म्हणाले. आपल्या जातीचा उपयोग करून दुसर्या जातीबद्दल विष कालवून निवडणुकीमध्ये त्यांना ३कसा फायदा होईल, असा काही पक्षांचा आणि काही नेत्यांचा एक राजकीय कार्यक्रम असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मात्र लोकांचं मत हे विकासाचं आहे. काही विविध योजनांमधून त्यांना जो काही फायदा मिळाला. त्यांच्या जीवनात जो सुसह्यपणा आला, त्याकरीता असल्याचे ते म्हणाले. आरोग्य योजना, अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालय, विधी विद्यापीठ यासह मिहान प्रकल्पही आला.यातून 88 हजार लोकांच्या हाताला रोजगार मिळाला. माझ्याकडे त्यांची यादी देखील आहे.मला हे माहित नाही की ते कोणत्या जातीचे आहेत, पण ते इथले आहेत, आणि स्थानिक आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले आहे. जातीपेक्षाही लोकांना विकास हवा असे ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…