Saturday, June 3, 2023

Latest Posts

आता झळकले नाना पटोलेंचे बॅनर, नक्की कोणाला मिळणार भावी मुख्यमंत्री पदाचा मान?

आज दिनांक २५ मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये त्यांचे बॅनर्स हे लावण्यात आले आहेत

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणारा अनेक घडामोडी या घडत आहेत. भावी मुख्यमंत्री कोण होणार याच्या अनेक चर्चा या रंगत आहेत. अनेक दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होत. त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तर अवघ्या २-३ दिवसांपर्यंत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चांगलेच चर्चेत होते. तर आता या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांच्या नावाची भर ही पडली आहे.

आज दिनांक २५ मे रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये त्यांचे बॅनर्स हे लावण्यात आले आहेत. या लावलेल्या बॅनर्सवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री (Future Chief Minister) असा उल्लेख करण्यात आला आहे. कल्याणमध्ये (Kalyan) लावण्यात आलेल्या या बॅनरवरुन आता एकच चर्चा सुरू आहे. कल्याणमधील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आले. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

एकीकडे महविकास आघाडीमध्ये चर्चा बैठकांचा सपाटा सुरू असताना काँगेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरले आहेत.

हे ही वाचा:

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss