बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणावरून जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. लक्ष्मण हाके म्हणाले की, परभणीच्या प्रकरणामध्ये देशातील मोठे नेते येऊन गेले, मात्र शासनाचे अधिकृत प्रतिनिधी आले नाहीत, ज्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोप केले जात आहेत, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संबंधित अधिकाऱ्याची कारकीर्द वादग्रस्त आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही त्यांच्या कुटुंबियाची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या जाण्याने कुटुंबाचे नाही तर समाजाचे नुकसान झाले आहे. शासनाने नोकरी दिलीच पाहिजे, परंतु आरोपीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशातील एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर देखील शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. परभणीचे प्रकरण असो की बीडचा प्रकरण असो यातील आरोपी बाहेर सुटले नाही पाहिजे.
अशातच अंजली दमानिया यांनी लक्ष्मण हाके आणि वाल्मिक कराड यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावर लक्ष्मण हाके म्हणाले, “अंजली दमानिया यांनी माझा फोटो ट्विट केला आहे. माझ्या बरोबरच शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, अनेक आमदार, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांचे देखील वाल्मिक कराडसोबत फोटो आहेत. त्यामुळे या सगळ्यांसाठी एक जेल बनवायला सांगा आणि ज्यांचे ज्यांच्या सोबत फोटो आहेत त्यांना त्या जेलमध्ये टाका. त्यानंतर मला यांचा सहवास लाभेल आणि महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत ते समजतील. अंजली दमानिया धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागून सनसनाटी निर्माण करत आहेत, अंजली दमानिया यांनी जेवढी जेवढी प्रकरणी काढली त्याच्यापुढे काय झाले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे काही चौकशी सुरू आहे त्याच्यावर प्रभाव टाकणे एवढाच उद्देश अंजली दमानिया यांचा आहे.
हे ही वाचा:
आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात; जरांगेची Dhanjay Munde यांच्यावर टीका
राम कमलच्या “बिनोदिनी” तील “कान्हा” गाण्यासाठी श्रेया घोषालच्या आवाजाची जादू