spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

‘दगडापेक्षा वीट बरी’ प्रमाणे महाविकास आघाडीपेक्षा महायुती बरी: Lakshman Hake

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. अश्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी मोठे वक्तव्य केले असून ‘दगडा पेक्षा वीट बरी’ प्रमाणे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पेक्षा महायुती (Mahayuti) बरी असे वक्तव्य केले आहे.

राज्यात निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात आरक्षणावरून झालेल्या वादात लक्ष्मण हाके यांनी पुन्हा मोठे वक्तव्य केले आहे. आज त्यांनी (शनिवार, १७ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर चांगलीच आगपाखड केली. ते यावेळी म्हणाले, “या महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपलं बहुमुल्य मत योग्य त्या माणसाला आणि योग्य पक्षाला द्या. या वर्षभराच्या कालावधीत ज्या आमदार, खासदार, लोकप्रतिनीधींनी जरांगे यांना लेखी पत्र दिले तिच माणसं आपल्याकडे मत मागायला येत आहेत, त्यांना मागील काळात काय केलं याचा जाब विचारा,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कुणी ? महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करु नका. मराठा समाजाला कुणबी मानणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे हीच भूमिका मी घेत आलो पण याला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी फासला आहे. तुतारीची टोळी महाराष्ट्रात भामटेगिरी करते. ओबीसी – मराठा बांधवांमध्ये जरांगे यांनी तेढ निर्माण केली त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे. २८८ विधानसभा मतदारसंघा सोडून जरांगे फक्त येवला मतदारसंघात गेला या माणसाला ओबीसीने आता ओळखले आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “उत्तमराव जाणकर यांना तिकीट दिली ओबीसी वेडा वाटतो का? महाविकास आघाडीला मतदान करण्यापेक्षा ओबीसीला मतदान करा. ‘दगडा पेक्षा वीट बरी’ प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी. घनसावंगी, बदानापूर, जाफराबाद या मतदार संघात ओबीसींचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पुर्ण पाठींबा दिला आहे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss