spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

मंत्रिमंडळातून भुजबळांना स्थान न दिल्याने ओबीसी नेते Laxman Hake आक्रमक

मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना स्थान न दिल्याने नाराज झालेले ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत. याचदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना स्थान न दिल्याने नाराज झालेले ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत. याचदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) ओबीसी विरोधी भूमिका घेत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय होत आहे. छगन भुजबळ (Chagan Bhujbal), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) ओबीसींचा आवाज आहे. महायुतीने या दोघांनाही डावलून काय संदेश दिला जातोय, असा सवालही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जातीय विद्वेष देऊ नका. वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) आणि धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यासोबत फोटो आहेत तर इतर नेत्यांसोबत फोटो दिसत नाही का? असे लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनावरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांना शुभेच्छा आहेत. कायदेशीर मार्गाने त्यांनी आंदोलन कराव. ओबीसींमधून त्यांनी आरक्षण मागू नये. अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

शरद पवार आणि अजित पवार यांनी मुळशीमध्ये घडलेल्या घटनेबाबत जाऊन भेटायला हवं, बिल्डर धमकावले जातात, रांजणगाव एमआयडीसीमध्ये काय सुरु आहे. मुळशी पॅटर्न चित्रपट येतोय. पुणे जिल्ह्यात काय सुरु आहे, काका-पुतणे यावर गप्पा आहेत? असा प्रश्नही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

चक्क सरकारी योजनेत Sunny Leone चे नाव; महिन्याला मिळत होते हजार रुपये

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ६८ जागांसाठी भरती लगेच करा अर्ज, जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss