Thursday, November 30, 2023

Latest Posts

आरक्षण प्रश्नावर शिंदे गटाचे आमदार म्हणाले, राजीनाम्याने प्रश्न सुटणार असतील तर…

ल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मागणीसाठी राजीनामा सत्र सुरु असून राज्यातील आमदार खासदारांनी राजीनामा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापला असल्याचे चित्र हे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण या मुद्यावरून आता राज्यातील नेते मंडळी देखील आरोप प्रत्यारोप यांच्या वादात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मागणीसाठी राजीनामा सत्र सुरु असून राज्यातील आमदार खासदारांनी राजीनामा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रमध्ये दोन-तीन आमदार आणि दोन-तीन खासदारांनी राजीनामे (Resign) दिल्याची माहिती समोर आली आहे. माझ्या राजीनाम्याने जर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्री राजीनामा द्यायला तयार आहे. पण पदाचा राजीनामा देऊन आपण लढू शकत नाही, न्याय द्यायचं असेल तर पदावर राहून आपण न्याय देऊ शकतो, असा विश्वास जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी व्यक्त केला आहे.

तसेच मराठा आरक्षणाच्या (Reservation) मागणीवर तातडीने निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत आमदार किशोर पाटील म्हणाले की, निश्चितपणे मी देखील मनोज जरांगे पाटलांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला पाठिंबा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदयांकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली असावी. पण जर ती केली नसेल तर मी आमदार म्हणून निश्चितपणे मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी करणार आहे. अधिवेशनात चर्चा करून सर्वानुमते ठराव करून ह्या प्रश्नाला तातडीने मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, असे सांगत पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. जर मी आज पदाचा राजीनामा दिला तर आमदार म्हणून मला सभागृहात जाऊन प्रश्न मांडता येणार नाही. म्हणून मी आमदार राहूनच या मराठा बांधवांना (Maratha Aarakshan) माझ्या पदाचा उपयोग करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, जर माझ्या राजीनाम्याने जर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्री राजीनामा द्यायला तयार आहे. पण पदाचा राजीनामा देऊन आपण लढू शकत नाही, अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले

World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss