मुख्यमंत्र्यांनी मन की बात ऐकली आता मराठा आरक्षणावर जन की बात ऐकावी असं उद्धव ठाकरेंनी सुनावलं. त्यानंतर मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाने एक पत्र राष्ट्रपतींना लिहिले आहे.
मराठा आणि धनगर आरक्षणा संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट मागितली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून पाच किंवा सहा नोव्हेंबरला भेटीची वेळ मागितली आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू हे शिवसेना उद्धव ठकरे गटाचे नेते भेटीसाठी जाणार आहेत.
मराठा आरक्षणावर अजून मार्ग निघालेला नाही. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना देखील भेटण्याची तयारी आहे. पंतप्रधानांचे कर्तव्य आहे की राज्यात काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षणावर सरकारने स्वतःचे कपडे झटकू नयेत, आमचं सरकार येण्याआधीच सुप्रीम कोर्टात केस गेली होती, त्यामुळे आम्ही बाजू मांडली नाही असं म्हणणं चूक आहे असं त्यांनी सुनावलं. तसंच आमच्या सरकारमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीही होते याची आठवण त्यांनी करून दिली. केंद्राच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी ऐकलं नाही तर सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .