महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या. उद्या म्हणजे २० नोव्हेंबरला मंगळवारी महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघामध्ये एकच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाने सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटावर एक चर्चास्पद विधान केले. अजित पवार एक वेगळ्या विचारधारेचे आहेत. सध्या ते तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत, हे तुम्हाला चालतं. पण तिकडे उद्धव ठाकरे एक वेगळ्या विचारधारेचे आहेत, ते काँग्रेससोबत आहेत, म्हणून तुम्हाला चालत नाही, असे विचारण्यात आले. यावर अजित पवार आमच्यासोबत आले तरी आम्ही विचारधारा सोडली नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट बोलणं सोडलं नाही. पण उद्धव ठाकरेंना तिकडे हिंदुहृदयसम्राट असं बोलणं सोडावं लागलं, अशी टीका देवेंद्र फडणवीस केली.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे पूर्वी माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो भगिनींनो असं म्हणायचे. पण आता माझ्या जमलेल्या बांधवानो भगिनींनो मातांनो … असं म्हणतात. मग उद्धव ठाकरेंमध्ये बदल झाला ना… रंग बदलला ना.. आम्ही रांग बदलला नाही. आमचा रंग भगवाच आहे. मग अजितदादा येऊदेत की कोणीही, आमचा रंग भगवाच राहणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच आम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा अजित पवारांना आम्ही भगवे करू, एकवेळ अजित पवार भगवे झाले नाहीत तरीही आम्ही भगवे आहोत आणि कायमच भगवे राहू, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
तसेच अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील महायुतीच्या सभेला का आले नाही, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खुद्द पंतप्रधानांनी आम्हाला सांगितलं होतं की, तुम्ही सगळे याला तर तुमच्या सभा होऊ शकणार नाही. सगळयांनी यायची गरज नाही, प्रत्येकाने सभा वाटून घ्या. त्याप्रमाणे आम्ही सभा वाटून घेतल्या”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हे ही वाचा:
हितेंद्र ठाकूरांचा दावा, तावडेंनी २५ फोन केले, मला माफ कर, जाऊ द्या….
निवडणूक आयोगाकडून Yugendra Pawar यांचे सर्च ऑपरेशन; अधिकारी नेमकं काय म्हणाले?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.