spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

आमचं व्हिजन खूप मोठं – अमित ठाकरे

माहीम मतदारसंघात महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे उभे आहे. आज या मतदारसंघातील प्रभादेवी येथे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा होत आहे.

माहीम मतदारसंघात महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे उभे आहे. आज या मतदारसंघातील प्रभादेवी येथे अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

ते या वेळेस बोलले मी कधीच एवढे मुलाखती एवढे भाषण मी आयुष्यात कधीच दिले नाही आहे. मनसेची उमेदवार जाहीर झाल्यास तीन तासानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक उमेदवर जाहीर करण्यात आला. त्याच्या नंतर माझ्या काकांना खूप वाईट वाटलं की मी कसा मागे पडलो. एखाद दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्याझाल्या मी पहिला फोन संदीप देशपांडेंना केला. कुठे तरी वरळीमधनं माघार घेतला तर आम्ही माहीम मधनं माघार घेऊ अश्या बातम्या ऐकलं. मला माहित नव्हतं खार आहे की खोटं आहे पण तरी सुद्धा मी पहिला फोन संदीप देशपांडेला केला की माघार घ्यायची नाही. आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच. माझ्या समोर तीन नाही तर सहा उमेदवार उभे आहेत आणि सहाचे जरी सहाशे उमेदवार जरी उभे असतील तरी मला फरक पडत नाही. माझा माहीम कारांवर विश्वास आहे.

ते पुढे बोलले, माहीम हे सुसंकृत, अभ्यासू असा ओळखला जातो आणि पाणी ही आपली समस्या आहे. आपण या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय. हा समुद्र किनारा स्वछ करण माझं स्वप्न आहे. परंतु या पेक्षा मोठं माझं व्हिजन आहे. मी स्वछ, साफ समुद्र किनारा बघितला आहे आणि मला वाटतं कि तो प्रत्येकानी बघितला पाहिजे कारण तो निसर्गानी आपल्यला दिलाय आहे. तो ना सरकार ने दिलाय आणि ना आम्ही दिलाय. मला या सगळ्या गोष्टींच्या बाहेर जाऊन काम करायचं आहे. माझं व्हिजन या पेक्षा मोठं आहे. पोलीस बांधव असतील, कोळीबांधव असतील, महिला असतील, आजी आजोबा असतील, यांच्या या सगळ्या समस्या सहज पने सुटू शकणारे विषय आहे. म्हणजे त्यांच्या गरजा पण मोठे नाही आहे. मी तुम्हाला एका महिन्याच्या आत तुम्हाला हे विषय सोडून देऊ शकतो. पण तुम्हाला पाच वर्षात काय होऊ शकत याचा तुम्हाला अंदाजा पण नाही आहे.माहीम मध्ये चालत असताना मला अनेक लोक म्हणतात कि हा विषय सोडवू शकता का. या गरजांना सोडवण्यासाठी आमदार पण होण्याची गरज नाही आहे. मुंबई मध्ये माहीम मध्ये चालतांना समाधान नाही मिळत. हे समाधान कुठे तरी कमी झालाय मला ते समाधान परत आणायचंय. आमचं व्हिजन खुप मोठं आहे.

Latest Posts

Don't Miss