spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटातून आऊटगोईंग वाढलं!, पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंकडून मोठा धक्का

राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार असे यश मिळाले आहे. हे यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार असे यश मिळाले आहे. हे यश मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विराजमान झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी निराशा पत्करावी लागली आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष बळकट होत चालले आहेत. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अश्यातच आणखी एक मोठा धक्का शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला बसला आहे.

मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच यांसह ३० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पाडला. शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी हा पक्षप्रवेश घडवून आणला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर दुसरीकडे पुण्यातही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला. पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेडमध्ये सुद्धा असच झालं. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातून आऊटगोईंग मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल होत आहेत. महायुतीकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हा ओघ असाच सुरु राहिला, तर आगामी काळात या दोन्ही गटांच राजकीय दृष्ट्या अजून मोठ नुकसान होईल. पुढच्या काही महिन्यात महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा कुठल्याही पक्षाचा पाया असतो. कारण या निवडणुकीतून निवडून येणारे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच हे थेट जनतेच्या संपर्कात असतात. यांच्यामधूनच पुढे आमदार, खासदार आणि मंत्री घडतात. त्यामुळे हे आऊटगोईंग असच सुरु राहिलं, तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.

हे ही वाचा:

कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजूरी

आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss