Sunday, March 17, 2024

Latest Posts

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची उद्या होणार भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरु आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं बातमी समोर आली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची उद्या भेट होणार आहे अशी माहिती माध्यमांच्या माध्यमातून समोर आली आहे. या दोन्ही वेगळ्या पक्षाच्या नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे की, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर एकनाथ खडसे हे उपस्थित असणार आहेत.

यावेळी देखील पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत राजकीय चर्चा होण्याची शकता वर्तवण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारणामध्ये चर्चाना उधाण आले होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मी भाजपची नाही तर भाजप पक्षात मी आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरून एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा एकनाथ खडसे म्हणाले होते की, भाजपमध्ये अस्वस्थथा आहे.

पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे पंकजा मुंडे यांनी ज्या शब्दांमध्ये आपली उद्विग्नता व्यक्त केलीय ती अतिशय वेदनादायी आहे. पक्षासाठी जसे गोपीनाथ मुंडे यांनी जसे संपूर्ण आयुष्य घालवले तसेच प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी देखील त्यांचे आयुष्य पक्षासाठी घातले आहे. असे एकनाथ खडसे म्हणाले.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss