spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

संतोष देशमुख हत्या प्रकरणी Pankaja Munde यांच्याकडून SIT ची मागणी

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी पहिल्यांदाच गोपीनाथगडावरून पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी पहिल्यांदाच गोपीनाथगडावरून पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला होता. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि घरच्यांना सुद्धा न्याय देतील अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मंत्री यांनी दिली आहे. पंकजा मुंडे या अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केले.

पंकजा मुंडे पुढे म्हणाले,”ऊसतोड कामगारांची पोरं ऊस तोडायला जातात हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. बारामतीमध्ये मुलाचा खून, पुण्यात मुळशी पॅटर्न अद्याप सुरु आहे, कोयता गॅंग ऍक्टिव्ह आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न करता सामान्य माणसाला न्याय देता येईल अशी भूमिका आम्हाला घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. मजूर आणि ऊसतोड कामगारांचे उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.

या संदर्भात मी अद्याप आढावा घेतला नाही. मात्र ऊसतोड कामगारांसोबत त्यांची मुलं जात नाहीत. गावातच राहतात. त्यांची तिथं राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मी मराठवाड्यात झालेल्या सर्वेक्षण अद्याप पाहिलेला नाही ते कितपत खरं आहे हे मी पाहिलेलं नाही. सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी त्यांच्या खात्याकडून योगदान झालं तर चांगला होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील. तसेच त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मानव जातीला वाचवायचं असेल तर प्रदूषण वाचवायला पाहिजे, पंचगंगा नदीचं काम हाती घेणार, नद्यांना प्रदूषणमुक्त करणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

धक्कादायक खुलासा ! कल्याण अत्याचार प्रकरणी बायको आणि मित्रानेच केली मदत

स्वकर्तृत्वावर Devendra Fadnavis यांनी विश्वासाला केले सार्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss