spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

राजकारणात रंगलेल्या चर्चांवर Pankaja Munde स्पष्टचं बोलल्या

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा नववा स्मृतिदिन आहे. या स्मृति दिनानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा नववा स्मृतिदिन आहे. या स्मृति दिनानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दमदार भाष्य केले आहे. याआधी पंकजा मुंडेच्या बाबतीत अनेक चर्चा राजकीय वर्तुळमध्ये रंगल्या होत्या त्यावर पंकजा मुंडे स्पष्ट्पणे बोलल्या आहेत. आजच्या कर्यक्रमामध्ये पंकजा मुंडे बोलताना त्यांनी सर्व विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील गडावर दाखल झाले होते.

स्मृति दिनानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर पार पडलेल्या कार्यक्रमाच्या दाराआड एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात चर्चा झाली असणार अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. पंकजा मुंडे यांच्या एका विधानावरून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पंकजा मुंडे जेव्हा समर्थकांशी संवाद साधत होत्या तेव्हा त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मला जर वेगळी भूमिका असे तर पंकजा मुंडे अशीच तुम्हा सगळ्यांना बोलवेल आणि तुमच्यासमोर बिनधास्त भूमिका घेईल. पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोक भूमिका घेईल असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, अमित शाह माझे नेते आहेत आणि मी त्यांची भेट घेणार आहे. त्यांनतर सर्व विषयांवर मी बोलणार आहे. रडगाणे गाणारे मी नाही, मी कुणापुढे पदर पसरणार नाही. हे सर्व मी माझ्या लोकांसाठी करणार आहे. मला कोणाकडून काही अपेक्षा नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या..

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss