spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पंकजा मुंडे यांचा सुरु होणार शिवशक्ती परिक्रमा दौरा

सध्याचे राजकारण हे पवारांच्या भोवती फिरत होते . मात्र आता दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा मैदानात उतरल्या असून आजपासून संपूर्ण महराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून सुरू झाली असून आज संपूर्ण दिवस पंकजा मुंडे नाशिक जिल्ह्यात असणार आहेत.

सध्याचे राजकारण हे पवारांच्या भोवती फिरत होते . मात्र आता दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा मैदानात उतरल्या असून आजपासून संपूर्ण महराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून सुरू झाली असून आज संपूर्ण दिवस पंकजा मुंडे नाशिक जिल्ह्यात असणार आहेत. भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून सोशल मीडिया, माध्यमे, राजकीय चर्चा यांपासून लांब होत्या. भाजपच्या अंतर्गत वादामुळे नेहमीच पंकजा मुंडे यांनी यावर बोलणं टाळले. मध्यंतरी त्यांनी राजकीय सुट्टी जाहीर करत दोन महिन्यांची रजा घेतली. आता पुन्हा त्या राजकारणात सक्रिय झाल्या असून शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात अनेक मंदिरांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांना देखील भेटणार आहेत. या दौऱ्याची सुरवात नाशिक जिल्ह्यापासून झाली असून आज सकाळी त्या नाशिक जिल्ह्यात औरंगाबाद मार्गे प्रवेश करणार आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याला ‘शिव-शक्ती परिक्रमा’ (ShivaShakti Parikrama) असे नाव देण्यात आले आहे. या दौऱ्याच्या ‘शिवशक्ती’ नावावरून मुंडे यांच्या राजकीय ऊर्जेसाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. या दौऱ्यात पंकजा मुंडे १० जिल्ह्यांचा दौरा करतील. यावेळी त्या विविध मंदिरांना भेटी देतील आणि पक्षाच्या सदस्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील. ‘शिव-शक्ती परिक्रमा’ मुख्य दौरा आज पासून सुरु झाला आहे. ४ सप्टेंबरला तारखेला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर पासून या दर्शन दौऱ्याला सुरवात होणार असून समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत. प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत.

४ सप्टेंबर रोजीचा प्रवास आज पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू करतील. सकाळी ८ वा. त्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतील. सकाळी पावणे नऊ वाजता कोपरगावकडे मोठा रेल्वे रवाना, सकाळी दहा वाजता दैत्य गुरु शुक्लेश्वर मंदिर दर्शन, त्यानंतर साडेदहा वाजता माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट, साडे अकरा वाजता येवल्यात आगमन, दुपारी बारा वाजता येवला येथून विंचूरकडे रवाना, दुपारी एक वाजता विंचूर येथून निफाडला रवाना, या ठिकाणी जळगाव येथील स्वर्गीय प्रल्हाद पाटील कराड यांच्या घरी भेट, निफाड शहरात स्वागत, दुपारी दीड वाजता निफाड शहर येथून पिंपळगाव बसवंतकडे रवाना, दुपारी अडीच वाजता, पिंपळगाव बसवंत येथून जउळकेकडे रवाना, जवळके गावात स्वागत, यानंतर सव्वा तीन वाजता जउळके येथून सप्तशृंगी गडावर रवाना, सव्वाचार वाजता सप्तशृंगी गड दर्शन, त्यानंतर सव्वा पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी येथे दर्शन, दिंडोरी येथून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिककडे रवाना, सायंकाळी आठ वाजता स्वर्गीय रामभाऊ जानोरकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर शहरात मुक्काम असणार आहे. तर ५ सप्टेंबर चा प्रवास हा आठ वाजता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे रवाना या ठिकाणी त्र्यंबकेश्वर दर्शन केल्यानंतर भीमाशंकर कडे पंकजा मुंडे रवाना होतील.

हे ही वाचा: 

जालन्यातील मराठा आंदोलनकांची राज ठाकरे आज घेणार भेट

…आणि पार्सल उघडल्यावर बघितला तर दिसले “हे”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss