Wednesday, April 24, 2024

Latest Posts

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला पवारांचे अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे कालपासून सातारा दौऱ्यावर आहेत. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे कालपासून सातारा दौऱ्यावर आहेत. आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६४ वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीच्या निमित्त राज्यामधील सेवक वर्ग मोठ्या संख्यने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्याला येत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला साताऱ्यामध्ये अभिवादन केले. त्यानंतर शरद पवारांनी आणि अजित पवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी देणगीदार रामशेठ ठाकूर शकुंतला ठाकूर यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. त्यांनतर शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्याचे लक्ष लागले आहे. शरद पवार सातारा दौऱ्याच्या दरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित असणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्त पवारांचा हा दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मागील आठवड्याभरामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यावर शरद पवार ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. शरद पवार देखील साताऱ्यामध्ये दाखल झाले आहेत.

शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यातील आजचे कार्यक्रम
९ मे २०२३

सकाळी ८.३० वाजता – कै.कर्मवीर भाऊराव पाटील सातारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सकाळी ८.४५- १०.३० वाजता – कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी सोहळा
सकाळी ११.०० वाजता – रयत शिक्षण संस्था साताराची वार्षिक सर्वसाधारण सभा
दुपारी १२. १५ ते १२.३० वाजता – साताऱ्याहून जकातवाडी येथे जाणार
दुपारी १२.३० वाजता भटके-विमुक्त विकास-संशोधन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
दुपारी ०३.३० वाजता – जकातवाडी हुन साताऱ्याच्या दिशेने रवाना
दुपारी ०३.५५ वाजता – सातारा येथे आगमन
दुपारी ०४.०० वाजता – सातारा सैनिक स्कूल हेलिपॅड, येथे आगमन
दुपारी ०४.३० वाजता – पुन्हा बारामतीला पोहोचणार

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss