Tuesday, April 23, 2024

Latest Posts

कर्नाटक निवडणुकीच्या आधारे २०२४मध्ये लोकसभा आणि विधानसभेत लोक भाजपाच्या विरोधात निकाल देतील – रोहित पवार

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची पराभव झाल्यानंतर देशभर हा निकाल चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेसला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची पराभव झाल्यानंतर देशभर हा निकाल चर्चेचा विषय ठरला होता. काँग्रेसला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या मविआच्या नेत्यांवर खोचक टीका करण्यात आल्यानंतर त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.लोक बदल करत असतात. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी नऊ महिने गेले. जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सत्ताबदलाची संधी लोकांना दिली जाते, तेव्हा ते लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय देत असतात. महाराष्ट्रातही सामान्य लोक हे निकाल भाजपाच्या विरोधात देतील. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पण त्याला यश आलं नाही. तिथे जे घडलं, ते प्रत्येक राज्यात घडेल, असं रोहित पवार म्हणाले.

मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी” अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यावरून रोहित पवारांनी टोला लगावला आहे. “अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार देखील केला. मात्र तरीही भाजपा हरते. हा एक मोठा संदेश आहे. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाळणा कुठे, बारसं कुठे? असं बोलण्यात अर्थ नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. त्यामुळे उगाच शब्दांत खेळू नका. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. संतांच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्धी चांगली झाली आहे. योग्य निर्णय ते देतील. उगाच गंडवण्याचा प्रयत्न करू नका”, असंही रोहित पवार म्हणाले.

तसेच रोहित पवार यांनी ओळ कोल्हे यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित महानाट्याचा प्रयोग बंद पाडल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर केला आहे. त्यासंदर्भात रोहित पवारांनी भूमिका मांडली आहे. “काही पोलिसांनी पैसे मागितले. छत्रपती संभाजीराजेंचा कार्यक्रम होत असताना पोलिसांनी पैसे मागितले. पोलीस प्रशासन, कोणत्याही महानगर पालिका, जिल्हा परिषदेत तिथले काही अधिकारी वेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांकडे पैशांची मागणी करत आहेत. मंत्रीही काही कमी नाही. कर्नाटकात ४० टक्क्यांचा आकडा होता. महाराष्ट्रात तो २० टक्क्यांचा नक्कीच असेल. निवडणुकाच होत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांनी दाद मागायची कुठे? अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायचं का?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा : 

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, देवेंद्र फेडणवीसांनी केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss