PM Narendra Modi LIVE: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) महायुतीची सभा धुळे विधानसभा मतदारसंघातून पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनदेखील विरोधकांवर निशाणा साधला.
“त्यानंतर तुमच्या आशीर्वादाने येथे महायुतीचे सरकार स्थापन झाले. महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राने अडीच वर्षात विकासाचे नवे विक्रम रचले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षात महाराष्ट्राने विकासाचा अभिमान आणि आत्मविश्वास परत मिळवला आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतासाठी आपल्या बहिणी आणि मुलींचे जीवन सुसह्य करणे आणि त्यांना सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रिया पुढे गेल्यावर संपूर्ण समाजाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून मोठे निर्णय घेतले आहेत.”
“महिला सक्षमीकरणासाठी आमचे सरकार उचलत असलेली पावले काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला सहन होत नाहीत. महायुती सरकारच्या माझी लाडकी बहिन योजनेची किती चर्चा आहे हे तुम्हाला माहीत आहे. मात्र माझी लाडकी बहिन योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे.”
“सत्ता मिळाल्यास सर्वप्रथम ही योजना बंद पाडू, असा निर्धार काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने या आघाडीच्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. हे लोक स्त्री शक्ती कधीच बळकट होताना पाहू शकत नाहीत. काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी आता महिलांवर कसा अत्याचार केला आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कसली शिवीगाळ, कसल्या कमेंट्स, महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न. आघाडीच्या या कृत्याला महाराष्ट्रातील कोणतीही माता-भगिनी कधीही माफ करू शकत नाही.”
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर