PM Narendra Modi LIVE: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (शनिवार, ९ नोव्हेंबर) महायुतीची सभा अकोला विधानसभा मतदारसंघातून पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात करत काँग्रेसनारे देशात जातीयवादाला खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे. देशातील विविध जातींमध्ये भांडणे लावणे हा काँग्रेसचा स्वभाव आहे, असे म्हणत देश जितका कमकुवत असेल तितकी काँग्रेस मजबूत होईल अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “देश जितका कमकुवत असेल तितकी काँग्रेस मजबूत होईल, हे काँग्रेस पक्षाला माहीत आहे. त्यामुळे विविध जातींमध्ये भांडणे लावणे हा काँग्रेसचा स्वभाव आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने आपल्या दलित समाजाला कधीही एकत्र येऊ दिले नाही, आपल्या एसटी समाजालाही विविध जातींमध्ये विभागून ठेवले. ओबीसी हे नाव ऐकताच काँग्रेसला चीड येते. ओबीसी समाजाला वेगळी ओळख मिळू नये यासाठी काँग्रेसने विविध खेळ खेळले.”
“एससी समाजातील विविध जाती आपापसात लढत राहाव्यात, अशी काँग्रेसची इच्छा आहे. कारण तिला माहीत आहे की एससी समाजातील विविध जाती आपापसात भांडत राहिल्या तर त्यांचा आवाज बिथरला जाईल, त्यांची मते विखुरली जातील आणि असे झाले की काँग्रेसचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा होईल.”
“जेव्हा तुम्ही अनुसूचित जाती म्हणून एकत्र राहणार नाही आणि तुमच्याच जातींमध्ये फूट पाडून लढा द्याल, तेव्हा त्याचा फायदा काँग्रेस घेईल. काँग्रेस एससी समाजाचे हक्क हिरावून घेईल आणि एससीला कमकुवत करून सरकार स्थापन करेल. ही त्याची युक्ती आहे, हे त्याचे पात्र आहे,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य