spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi LIVE: आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पण काँग्रेसने… पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर निशाणा

PM Narendra Modi LIVE: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (शुक्रवार, ८ नोव्हेंबर) महायुतीची सभा धुळे विधानसभा मतदारसंघातून पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला दिलेल्या अभिजात भाषेच्या दर्जावरून भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला.

“आपल्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, याचा मला अभिमान आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही महाराष्ट्रातील जनतेची अनेक दशकांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र आणि केंद्रात एकाच वेळी सरकारे चालवली. पण, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची गरज आहे, असे त्यांना वाटले नाही. मराठी भाषेच्या सन्मानाच्या मागणीकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले.”

“मोदींनी हे कसं केलं, का केलं असा प्रश्न त्यांना अजूनही पडतोय! महाराष्ट्राच्या नावावर राजकारण करणाऱ्या आघाडीचा हा खरा चेहरा आहे. भाजपने नेहमीच ‘सबका साथ-सबका विकास’ या उद्देशाने काम केले आहे. आपला आदिवासी समाजही या ठरावाचा महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासात या समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कधीच आदिवासींचा स्वाभिमान आणि आदिवासींच्या स्वाभिमानाकडे लक्ष दिले नाही.”

“आदिवासी वारशाचा न्याय आणि आदिवासी तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक दशके मेहनत घेतली.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यावर स्वतंत्र आदिवासी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. मग पहिल्यांदाच या समाजाच्या आदिवासी हित आणि अपेक्षांना महत्त्व प्राप्त झाले. आपल्या सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ‘आदिवासी गौरव दिन’ सुरू केला आहे. आदिवासी परंपरेला मान्यता मिळावी हा त्याचा उद्देश आहे. यावेळी 15 नोव्हेंबरपासून पुढील 1 वर्षासाठी आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरी करणार आहोत.”

Latest Posts

Don't Miss