Sunday, June 4, 2023

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर, १९,००० लाभार्थ्यांना घराचे वाटप

भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.

भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. आज नरेंद्र मोदी सुमारे ४,४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत १९,००० लाभार्थ्यांना आज घराचे वाटप करण्यात येणार आहे म्हणून आज ते गुजरातला भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जरी केलेल्या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गांधीनगरमधील अखिल भारतीय शिक्षा संघ अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि गिफ्ट सिटीलाही भेट देणार आहेत. त्याचबरोबर गांधीनगमधील कार्यक्रमाच्या दरम्यान मोदी २,४५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत असे माहिती देण्यात आली आहे.

आज गुजरातमध्ये केंद्र सरकारच्या योजनेच्या योजनेंतर्गत १९,००० लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहेत. यामध्ये नगरविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि वाहतूक विभाग, खाण आणि खनिज विभागाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या सुपूर्द करणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १,९५० कोटी रुपये करण्यात आला आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीच्या भेटीच्या दरम्यान नरेंद्र तिथे सुरु असलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत. याच दरम्यान ते अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि भविष्यामधील योजना ते समजून घेणार आहेत. अखिल भारतीय शिक्षण संघ अधिवेशन हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे २९ वे द्विवार्षिक संमेलन आहे.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss