महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती सत्ता आल्यापासून पक्षांतराच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या गोटातील अनेक लहान मोठे नेते जसे वारे वाहतील तसे सध्या पक्ष बदलताना दिसत आहेत. अशातच आता शिंदे गटाकडून सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावल्याचे समोर आले आहे. शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर हे शिवसेना शिंदे गटाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीनवेळा भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रमेश बारसकर हे दोन दिवसांत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. रमेश बारसकर यांच्यासोबत तीन माजी नगरसेवक, दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रमेश बारसकर हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सक्रिय झाला आहे. महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्यास तयार आहे. पण शरद पवार गट आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लादण्यास इच्छूक आहे. तर शिंदे गटाचे प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’ रावण्याचे संकेत दिले होते. भविष्यामध्ये पुढे काय काय होणार हे तुम्ही बघाल. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले की खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
हे ही वाचा :