Wednesday, April 24, 2024

Latest Posts

नागपुरात झळकले आदित्य ठाकरेंचे पोस्टर्स, भावी मुख्यमंत्री…

आता पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री म्हणून एक नवं नाव चर्चेत आलं आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आता भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चेत आहे आणि संदर्भात पोस्टर्स देखील नागपुरात लावण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणारा अनेक घडामोडी या घडत आहेत. भावी मुख्यमंत्री कोण होणार याच्या अनेक चर्चा या रंगत आहेत. भावी मुख्यमंत्री कोण होणार याच्या अनेक चर्चा या रंगत आहेत. अनेक दिसावं भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होत. त्यांनतर देवेंद्र फडणवीस यांचा देखील भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे, जयंत पाटील तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे देखील पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले आहे. तर आता पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री म्हणून एक नवं नाव चर्चेत आलं आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आता भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चेत आहे आणि संदर्भात पोस्टर्स देखील नागपुरात लावण्यात आले आहेत.

आज दिनांक २२ मे रोजी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे नागपूरच्या दौऱ्यावर जात आहेत. कोराडी वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नांदगाव आणि वराडा गावाला ते भेट देणार आहेत. तसेच या संपूर्ण दौऱ्यात आदित्य ठाकरे हे प्रदूषित गावांची पाहणी करणार असून येथील स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे लागले आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं नागपुरात आगमन होण्यापूर्वीच नागपुरात आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सने सर्वांचं लक्ष हे वेधून घेतलं आहे. तसेच या पोस्टर्स मुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण हे आलं आहे .

आज नागपुरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर्स हे लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उललकेह हा करण्यात आला आहे. नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. तर ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या पोस्टर्सवर फोटो आहेत. सध्या या पोस्टर्स मुले आणि पोस्टर वरील मजकुरामुळे राजकीय वर्तुळासह राज्यतील सर्वांचं लक्ष हे आदित्य ठाकरे यांच्या आजच्या दौऱ्याकडे लागले आहे.

हे ही वाचा:

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss