spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

गोपीनाथ गडावर Pankaja Munde च दमदार भाषण

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केले आहे. आजच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक पाहायला मिळाल्या. मागील पाच वर्षांमध्ये अनेकांचे पराभव झाले आहेत तरीसुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा आमदारकी आणि मंत्रीपदे देण्यात आली आहेत. परंतु आपल्याला मिळाली नाही त्यामुळे आता आपल्याला आपल्या नेत्यांशी चर्चा करणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, लवकरच मी अमित शाह यांची भेट घेणार आहे आणि त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदुका ठेवून चालवत आहेत. माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात माझ्या पक्षातही बदल झाले आहेत. मी मनामध्ये काही साठवून ठेवत नाही लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात. मी कोणासमोर झुकणार नाही. मला पहिल्या पाच वर्षांमध्ये जे अनुभव आले आहेत ते फार अनोखे आहेत. मी आज माझ्या पित्याच्या पुण्यस्मरणामध्ये त्यांच्या आठवणी अश्रू दाबून आलेल्या नेत्यांचे मी आभार मानते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी अनेकवेळा माझी भूमिका मांडली आहे आणि त्याच भूमिका मी परत मांडावी एवढे लेचेपेचे माझे शब्द नाहीत. माझे शब्द ठाम आहेत जसा रामाने बाण सोडला तर परत येत नसतो तसा गेलेला शब्द परत फिरवायची वेळ येऊ नये. माझ्या डाव्या बाजूला प्रचंड मोठी कमळाची आकृती आहे, त्यामध्ये माझे पिता गोपीनाथ मुंडे विसावले आहेत. आयुष्यामध्ये कधीच सत्तेचे स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षामध्ये माझ्या पित्याने राजकारणाला सुरुवात केली. सततच्या शिखरापर्यत पक्षाला पोहोचवण्याचं ज्यांचं योगदान आहे त्या गोपीनाथ मुंडे यांची मी कन्या आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss