Saturday, April 20, 2024

Latest Posts

प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे वक्तव्य

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खळबळ उडाली आहे. राजकारणात रोज नवीन घडामोडी देखील घडताना दिसत आहे. त्यामुळे एकेकानावर ताशेरे देखील उडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक खळबळ उडाली आहे. राजकारणात रोज नवीन घडामोडी देखील घडताना दिसत आहे. त्यामुळे एकेकानावर ताशेरे देखील उडत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये वाढ झाली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहेत. आणि म्हणूच की काय या संधीच अफायदा विरोधक उचलताना दिसत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना आलेली ईडी नोटीस देखील चर्चेत आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठी टीका होत आहे. शिंदे गटाचे नेते देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केलेल वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. तसेच त्यांचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनीही आंबेडकरांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? सध्या ईडीच्या कारवाईत राजकीय दबाव कुणावर असेल तर तो राष्ट्रवादी पक्ष आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रसकष आंबेडकर असे का म्हणाले असतील यावर राजकारणात नवीन चर्चा होताना दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरूच आहे रहे तर सगळ्यांना माहीतच आहे मात्र देखील असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे राजकारणात नये समीकरण तयार होणार की काय? असा प्रश्न येऊन ठाकला आहे. त्यांचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये जयंत पाटील आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी कोणताही विचार न करता जयंत पाटील यांचे नाव घेतले म्हणजे यात काही तरी तथ्य आहे त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात नवीन हालचाली होताना दिसत आहे. त्यांच्यासारखे अनेक नेते आहेत. तुम्ही भाजपमध्ये या नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेट त्यांना दिला तर पाटील भाजपमध्ये जायला कधीही उत्सुक असतील. जेलमध्ये जाण्यास उत्सुक नसतील.असे हि प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा:

‘खतरों के खिलाडी’च्या शूट दरम्यानची रोहित शेट्टींची रील सोशल मीडियावर व्हायरल

तिहार जेलमध्ये असलेल्या सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss