spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंनी केला संतप्त सवाल, महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा?

काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे शनिवारी (दि.९) झालेल्या दुर्गाशक्ती संवाद मेळाव्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अश्यातच आता धनंजय महाडिक आणि प्रणिती शिंदे यांच्यातील वाद समोर आलं आहे. काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे शनिवारी (दि.९) झालेल्या दुर्गाशक्ती संवाद मेळाव्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.

भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्या उजळाईवाडीतच शनिवारी झालेल्या सभेत खासदार महाडिक यांनी ज्या महिला आमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या प्रचाराला किंवा रॅलीला गेल्यास त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, त्यांची काय व्यवस्था करायची ते आम्ही बघतो असे वादग्रस्त विधान केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्याची दखल खासदार प्रणिती शिंदे यांनीही घेतली. त्या म्हणाल्या, भाजपच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली. चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना भाजप पाठीशी घालत आहे. लाडकी बहिणीचे पैसे घेतले आणि काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या, त्यांची व्यवस्था करतो अशी भाषा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. व्यवस्था करतो ही महाडिक यांची कसली भाषा आहे असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत खासदार धनंजय महाडिक यांचा व्हिडीओ स्क्रीनवर लावण्यास सांगितला. व्हिडीओ पूर्ण होताच त्यांनी धनंजय महाडिक यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. आजपर्यंतच्या कारकिर्दीत महिलांची एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली. ही गर्दी आमदार पाटील यांच्या विजयाची साक्ष देत आहे. ऋतुराज यांच्यासारखा कार्यक्षम तरुण आमदार आपल्याला लाभला आहे. विधानसभेच्या लॉबीमध्येही कर्मचाऱ्याऱ्यांची विचारपूस करणारा हा एकमेव आमदार असल्याचे कौतुकोद्गार प्रणिती शिंदे यांनी काढले.

Latest Posts

Don't Miss