Monday, June 5, 2023

Latest Posts

संजय राऊतांच्या स्वागताची बीडमध्ये जोरदार तयारी सुरु

आज उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या यंत्रासाठी आज ठाकरे गटाचे खासदार संजय आज या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

आज उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या वतीने बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या यंत्रासाठी आज ठाकरे गटाचे खासदार संजय आज या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आज या यात्रेचा बीडमध्ये समारोप होणार आहे. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे परळीमध्ये सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमध्ये मध्ये येणार असल्यामुळे परळी तालुक्याच्या तर्फे शिवसेनेचे वतीने जोरदार स्वागत करण्याची तयारी परळीमध्ये पाहायला मिळत आहे. राऊतांच्या स्वागतासाठी परळीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून २ क्विंटल फुलांचा हार क्रेनच्या सहाय्याने संजय राऊतांना घालण्यात येणार आहे.

बीडमध्ये आज ठाकरे गटाचे महाप्रबोधन या यात्रे दरम्यान संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची सभा होणार आहे. परळीमध्ये जागोजागो संजय राऊतांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे नक्की काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर ठाकरे गटामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले होते त्यावर संजय राऊतांची आणि सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. १८ मे रोजी सुषमा अंधारे या सभेच्या निमित्ताने सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आल्या होत्या. तेव्हा जिल्याप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाढ झाला होता. अप्पासाहेब जाधव यांनी दावा केला होता की त्यांनी सुषमा अंधारे यांना दोन फटाके मारले. त्यांनतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss