Thursday, April 25, 2024

Latest Posts

Mann Ki Baat च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी म्हणाले, चांगल्या भारतासाठी युवा संगम महत्त्वाचा

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे.

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आणि आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून संसद भवनाच्या पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम पार पडला आहे. आज नरेंद्र मोदी यांनी मन की बात च्या माध्यमातून सर्व देशवासियांना संबोधित केले आहे. तसेच आज बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्दे हे मांडले आहे.

आज पीएम मोदी म्हणाले, जेव्हा ‘मन की बात’ प्रसारित झाली, त्या वेळी जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये, कुठे संध्याकाळ झाली होती तर कुठे रात्र झाली होती. असे असूनही, मोठ्या संख्येने लोकांनी १०० वा भाग ऐकण्यासाठी वेळ दिला होता. तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत युवा संगम कार्यक्रमावर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी काही सहभागींशी संवाद साधला. यादरम्यान अरुणाचल प्रदेशचा विद्यार्थी ग्यामर न्योकुम याने पंतप्रधानांशी संवाद साधला आणि संगम कार्यक्रमावर ब्लॉग लिहून त्यांचे अनुभव शेअर करण्याचा सल्ला दिला.

आपल्या जपान भेटीचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो जिथे मला हिरोशिमा शांतता स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली. तो एक भावनिक क्षण होता. जेव्हा आपण इतिहासाच्या आठवणी जपतो तेव्हा त्याचा येणाऱ्या पिढ्यांना खूप फायदा होतो. तसेच पीएम मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आम्ही भारतात नवीन प्रकारची संग्रहालये आणि स्मारके बांधताना पाहिले आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी बंधू-भगिनींच्या योगदानाला समर्पित दहा नवीन संग्रहालये बांधली जात आहेत. पीएम मोदी म्हणाले, गुरुग्राममध्ये एक अनोखे संग्रहालय आहे. म्युझिओ कॅमेरा, यात १८६० नंतर ८ हजाराहून अधिक कॅमेऱ्यांचा संग्रह आहे. तामिळनाडूचे म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीज हे आपल्या दिव्यांगजनांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय हे असेच एक संग्रहालय आहे, ज्यामध्ये ७० हजारांहून अधिक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी वीर सावरकरांचे स्मरण केले आणि सांगितले की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खंबीरपणा आणि मोठेपणा सामावलेला होता. त्याच्या निडर आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामगिरीची मानसिकता अजिबात आवडली नाही. केवळ स्वातंत्र्य चळवळच नाही, सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी वीर सावरकरांनी जे काही केले ते आजही स्मरणात आहे.

हे ही वाचा:

New Parliament Building Inauguration, PM मोदींनी केले नवीन संसद भवनाचे उद्घाटन, जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन, तर सामनातून मोदी सरकारवर घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss