Friday, March 29, 2024

Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संसद भवनाच्या नवीन बिल्डिंगचे उदघाटन आणि त्याचवेळेस करणार …

खूप दिवसापासून राजकारणामध्ये नवीन संसग भवनाच्या बिल्डिंग च्या उदघाटन संबंधी वाद निर्माण होत होते. या वादामध्ये अनेक राजकारण्यांनी उड्या मारल्या.

खूप दिवसापासून राजकारणामध्ये नवीन संसग भवनाच्या बिल्डिंग च्या उदघाटन संबंधी वाद निर्माण होत होते. या वादामध्ये अनेक राजकारण्यांनी उड्या मारल्या. मात्र अनेकांनी नरेंद्र मोदी हे संसद भवनाच्या बिल्डिंगचे उदघाटन करणार हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान ७५ रुपयांचे नाणे बाजारात आणले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे विशेष नाणे लॉन्च केले जाणार असल्याची वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ७५ रुपयांच्या या नाण्याच्या डिझाईनपासून ते त्याचा आकार आणि छपाईपर्यंत अनेक वैशिष्ट्ये असतील. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आहे. अशा स्थितीत या नाण्याचे स्वरूपही नव्या संसद भवनासारखे असण्याची शक्यता आहे.७५ रुपयांचे नाणे कसे असेल? याबाबतची उत्सुकता आता लागली आहे.

संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत यात काही शंकाच नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वित्त मंत्रालयाकडून जारी करण्यात येणाऱ्या ७५ रुपयांचे नाणे कसे असेल हे त्यावेळी ते सगळ्यांसमोर दाखवणार आहे. त्यामुळे हे नाणे कसे असेल याबाबत सगळ्यांमध्येच चर्च सुरु आहे. परंतु हे ७५ रुपयांचे नाणे ३५ ग्रॅमचे आहे. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे असेल. याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल असेल. दुसरीकडे जर आपल्याला त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंह असेल, ज्याच्या खाली “सत्यमेव जयते” लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेलं पाहायला मिळेल. अशी रचना करण्यात आली आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले जाईल आणि त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.

तर नवीन संसद भवनाच्या रचनेबद्दल बोलायचे झाले तर, संसद भवन हे त्रिकोणी रचनेत बांधले आहे. संसदेची नवीन इमारत हि भौमितिक त्रिकोणी आकाराच्या डिझाइनची आहे. संसदेच्या त्याच्या लोकसभेत ८८८ जागा आहेत आणि त्याच्या अभ्यागतांच्या गॅलरीत ३३६ पेक्षा जास्त लोक बसू शकतात. याशिवाय संसद भवनात राज्यसभेच्या ३८४ खुर्च्या आहेत. नवीन संसद भवन तांत्रिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्यात एकापेक्षा एक तांत्रिक सुविधा आहेत. अशी एकंदर नवीन संसद भवनाच्या बिल्डिंगची व्यूहरचना करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पुन्हा एकदा संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

बक्षिसाच्या रकमेबरोबरच मनोरंजनही होणार डबल!, २९ मेपासून सुरु होणार ‘कोण होणार करोडपती’ चे नवं पर्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss