Tuesday, May 30, 2023

Latest Posts

पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला मोठा निर्णय

आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. आणि त्याचमुळे राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. आणि त्याचमुळे राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आणि त्यामुळेच आशिष देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या संबंधी पृथ्वीराज चव्हाणयांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि त्यामुळेच आशिष देशमुख यांच्या तोंडावर ताबा नसल्याने त्यांना हा विषय त्यांच्याच अंगलटी आला आहे. हे स्पष्ट होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं, “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आणि त्यानुसार आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.” आणि म्हणूनच आशिष देशमुखांवर जो निर्णय देण्यात आले तो तत्वाला अंधारून घेतली जात आहेत.

सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णयानुसार केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटलं. तसेच पक्षविरोधी कारवाया करून या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांमुळे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत आहे,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले आहे.

हे ही वाचा:

Accident पासून बचाव करायचा असेल तर, करा ‘या’ गोष्टींचे पालन

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

Follow Us

Latest Posts

Don't Miss