राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यासोबतच शहापूर विधानसभेचे (Shahapur Constituency) माजी आमदार पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राष्ट्रीय चिटणीस तथा राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, प्रदेश सचिव संजय शेटे, प्रदेश संघटक सचिव भालचंद्र शिरोळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्षाचे लातूर शहर अध्यक्ष राजा मणियार, लातूर ग्रामीण अध्यक्ष मदन काळे, लातूर शहर कार्याध्यक्ष बख्तावर बागवाण, युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत धार, लातूर महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई कदम, लातूर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बसीर शेख, उदगीर तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, निलंगा शहर अध्यक्ष इस्माईल लदाख व रेणापूर शहर अध्यक्ष बालाजी कदम, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार मिलिंद कांबळे, माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते तथा राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस श्री. बसवराज पाटील, प्रदेश सरचिटणीसप्रशांत पाटील, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष काशिनाथ पाटील, ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख, अविराज देशमुख, अविनाश थोरात, निलेश पाटोळे, खंडू बरोरा तसेच ठाणे ग्रामीण जिल्हा व शहापूर मतदार संघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यासोबतच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) व राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची राजभवन येथे भेट घेऊन मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…