spot_img
spot_img

Latest Posts

भंडारा उधळ्यानंतर विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

जालन्यात सुरु असेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) हे मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी उपोषणकर्ता बसले आहेत.

जालन्यात सुरु असेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) हे मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी उपोषणकर्ता बसले आहेत. त्यानंतर सकल मराठा समाज हा आता आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीनंतर आता धनगर समजानेदेखील आरक्षणचा मुद्दा उचलून धरला आहे. सोलापुरातील धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक होत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (MinisterRadhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा उधळला. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच ‘ अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेवर कोणताही रोष व्यक्त केला नाही.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवार (८ सप्टेंबर) रोजी त्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ८ सप्टेंबर शुक्रवारी त्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता.त्यानिमित्त ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी अनेकांनी त्यांना भेट दिली आणि विविध समस्या मांडल्या आहेत. त्याचवेळी धनगर समाजातील काही सदस्यांनी विखे पाटील यांची भेट घेतली. निवेदन स्वीकारत असताना विखे पाटील याच्यावर भंडारा उधळण्यात आला. ज्या सदस्यांनी त्याच्यावर भंडारा उधळला त्याना बेदम मारण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षण्याच्या मुद्यनंतर आता अनेक जाती आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झाल्या आहेत. याच मुद्यावरून धनगर समाज आक्रमक झाला आहे. यावेळी या मुद्यावर निवेदन देण्याचा निर्णय आरक्षण समितीने घेतला आहे. भंडाऱ्याची उधळण केल्यानंतर मारण्याची काय गरज होती असे सर्व प्रश्न विरोधकांनी उपस्थित झाले आहेत.

पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंदच झाला असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. तर भंडारा उधणाऱ्यांवर कोणताही कारवाई नको अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलीये. धनगर आरक्षणासंदर्भात ककृती समितीच्या भावनांबद्दल सरकार संवेदनशील असल्याची भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलीये ‘ असे विखे पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा: 

G २० परिषद म्हणजे नक्की काय?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली टीका, ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss