spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

विविध मागण्यांसाठी रघुनाथ पाटलांचा एल्गार; १९ मार्चला पुण्यात आंदोलन

राज्यभरात १९ फेब्रुवारी ते १९ मार्चच्या दरम्यान संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जागृती अभियानाचे आयोजन रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या अभिनयाची सांगता १९ मार्चरोजी पुणे येथे एक दिवसीय धरणे आंदोलनाने होणार असल्याचे मत शेतकरी संघटनेने अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पंढरपूर येथे व्यक्त केले. या अभियानाच्या माध्यमातून एक महिना राज्यभरातील विविध भागातील शेतकऱ्यांचे जनजागृती केली जाणार असून, यामध्ये सर्व शेमालवरील निर्यात बंदी उठवावी असेही ते म्हणाले.

नेमके मागण्या काय आहेत ?
दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा.
शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा.
ऊसाला प्रति टन 5000 रुपये भाव मिळावा.
दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द करण्यात यावी.
वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांची कर्जातून मुक्तता करावी असे मत रघुनात दादा पाटील यांनी व्यक्त केले. वरील मागण्यांसाठी हे जागृती अभियान राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. याचा सांगता समारंभ 19 मार्च रोजी पुणे येथे धरणे आंदोलनाने होणार आहे. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केले आहे.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss