Thursday, April 25, 2024

Latest Posts

राहुल गांधी यांना मिळाला दिलासा

राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानावरून त्यांच्यावर काही कायदे लावण्यात आले होते. तर त्यांना देशाच्या बाहेर जाण्याची मुभा देखील दिली नव्हती.

राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानावरून त्यांच्यावर काही कायदे लावण्यात आले होते. तर त्यांना देशाच्या बाहेर जाण्याची मुभा देखील दिली नव्हती. मात्र आता राहुल गांधी यांना काहीसा मिळाला आहे. काँग्रेस नेते याना संसद्भावनेतून सुद्धा हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोप दाखल केले होते. मात्र आता नेते राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट जारी करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेला दिल्लीतील न्यायालयाने आज परवानगी दिली. कोर्टाने राहुल गांधींना पासपोर्टबाबत तीन वर्षांसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली होती. दरम्यान या याचिकेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली. राहुल गांधी नवीन पासपोर्टसाठी एनओसीची गरज होती. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होची यावर आज सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी दहा वर्षासाठी एनओसीचा कालावधी वाढवून मागितला होता. मात्र न्यायालयाने राहुल गांधी यांना ३ वर्षासाठी एनओसी वैध असल्याचे म्हटले आहे. वकिलांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की जर त्याला एनओसीची मुदत वाढवायची असेल तर त्याला तीन वर्षांनी पुन्हा न्यायालयात यावे लागेल. त्यामुळे प्रत्येक तीन वर्षानंतर राहुल गांधी याना न्यायालयात हजेरी लावण्यासाठी दाखल व्हावेच लागणार आहे. गुजरातमधील सुरत येथील न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. हे प्रकरण ‘मोदी आडनाव’ संबंधित होते. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना खासदारकी देखील गमवावी लागली.

नवीन पासपोर्टसाठी एनओसी मागणाऱ्या राहुल गांधी यांच्या याचिकेवर बुधवारी (24 मे) दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. या एनओसीला सुब्रमण्यम स्वामींनी विरोध केला. ते म्हणाले की होते की, “ते (राहुल गांधी) सातत्याने परदेशात जातात. त्याच्यां परदेशवारीमुळे तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो.” सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्वामी यांना उत्तर दाखल करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली. या उत्तरात सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींना 10 वर्षांसाठी पासपोर्ट देण्याच्या याचिकेला विरोध केला आहे. दरम्यान, राहुल गांधी 31 मे रोजी आठवडाभरासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ४ जून रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे भारतीयांना संबोधित करणार आहेत. याशिवाय कॅलिफोर्नियातील एका विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा:

किरीट सोमैया यांनी दाखल केलेली याचिका घेतली मागे

“सरकार आपल्या दारी” योजनेच्या मार्फत सर्वसामान्यांना दिलासा, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss